Logo
Logo
mic
Download
सार्थ श्रीमद्‍ भगवद्‍गीता - अध्याय १

सार्थ श्रीमद्‍ भगवद्‍गीता - अध्याय १

Duration

2hr 49m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेला उपदेश श्रीमद्भगवद्गीता म्हणून ओळखला जातो. श्रीमद्भगवद्गीतेची पार्श्वभूमी महाभारताच्या युद्धाची आहे. ज्याप्रमाणे सामान्य माणूस आपल्या जीवनातील समस्यांमुळे गोंधळून जातो आणि त्यानंतर जीवनाच्या एकसंधतेपासून पळून जाण्याचा निर्णय घेतो, त्याचप्रमाणे महाभारताचा महान नायक अर्जुन आपल्यासमोर येणाऱ्या समस्यांपासून घाबरतो, निराश होतो,अर्जुनाप्रमाणेच आपण सर्वजण कधी ना कधी अनिश्चिततेच्या अवस्थेत निराश होतो किंवा आपल्या समस्यांमुळे विचलित होऊन आपल्या कर्तव्यापासून दूर जातो, अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्याला दिशा दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, सार्थ श्रीमद भगवद्गीता आणि त्याचा अर्थ आता आपल्या मराठी भाषेत.

Read More

श्लोक १

1 - श्लोक १

08 min 32 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक २

2 - श्लोक २

06 min 53 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ३

3 - श्लोक ३

06 min 48 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ४

4 - श्लोक ४

04 min 16 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ५, ६

5 - श्लोक ५, ६

04 min 05 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ७,८

6 - श्लोक ७,८

06 min 29 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ९

7 - श्लोक ९

02 min 50 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक १०

8 - श्लोक १०

02 min 58 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ११

9 - श्लोक ११

03 min 28 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक १२,  १३

10 - श्लोक १२, १३

06 min 50 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share

सार्थ श्रीमद्‍ भगवद्‍गीता - अध्याय १

Devotional|Marathi|34 Episodes
Like
share
like

About Show

श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेला उपदेश श्रीमद्भगवद्गीता म्हणून ओळखला जातो. श्रीमद्भगवद्गीतेची पार्श्वभूमी महाभारताच्या युद्धाची आहे. ज्याप्रमाणे सामान्य माणूस आपल्या जीवनातील समस्यांमुळे गोंधळून जातो आणि त्यानंतर जीवनाच्या एकसंधतेपासून पळून जाण्याचा निर्णय घेतो, त्याचप्रमाणे महाभारताचा महान नायक अर्जुन आपल्यासमोर येणाऱ्या समस्यांपासून घाबरतो, निराश होतो,अर्जुनाप्रमाणेच आपण सर्वजण कधी ना कधी अनिश्चिततेच्या अवस्थेत निराश होतो किंवा आपल्या समस्यांमुळे विचलित होऊन आपल्या कर्तव्यापासून दूर जातो, अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्याला दिशा दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, सार्थ श्रीमद भगवद्गीता आणि त्याचा अर्थ आता आपल्या मराठी भाषेत.

....Loading

EpisodesDuration
श्लोक १

1 . श्लोक १

धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥ १-१ ॥ धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले? ॥ १-१ ॥

More

08 min 32 sec

play

share

श्लोक २

2 . श्लोक २

सञ्जय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा । आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्‌ ॥ १-२ ॥ संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचर्यांजवळ जाऊन असे म्हणाला ॥ १-२ ॥

More

06 min 53 sec

play

share

श्लोक ३

3 . श्लोक ३

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्‌ । व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ १-३ ॥ अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने-द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने-व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पाहा. ॥ १-३ ॥

More

06 min 48 sec

play

share

श्लोक ४

4 . श्लोक ४

अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि । युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ १-४ ॥ युद्धात भीम आणि अर्जुनाप्रमाणे सैन्यात महान धनुर्धारी सात्यकी, महान राजा द्रुपद आणि विराटसारखे शूर पुरुष आहेत.

More

04 min 16 sec

play

share

श्लोक ५, ६

5 . श्लोक ५, ६

धृष्टकेतुश्‍चेकितानः काशिराजश्च वीर्यवान्‌ । पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ॥ १-५ ॥ युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्‌ । सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥ १-६ ॥ द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, बलवान काशिराज, पुरुजित, कुंतिभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत.

More

04 min 05 sec

play

share

श्लोक ७,८

6 . श्लोक ७,८

अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥ १-७ ॥ हे ब्राह्मणश्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत, ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत, ते मी आपल्याला सांगतो. ॥ १-७ ॥ भवान्‌ भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः । अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥ १-८ आपण-द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. ॥ १-८ ॥

More

06 min 29 sec

play

share

श्लोक ९

7 . श्लोक ९

अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः । नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ १-९ ॥ इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. ॥ १-९ ॥

More

02 min 50 sec

play

share

श्लोक १०

8 . श्लोक १०

अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्‌ । पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्‌ ॥ १-१० ॥ भीष्मपितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे; तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे. ॥ १-१० ॥

More

02 min 58 sec

play

share

श्लोक ११

9 . श्लोक ११

अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः । भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ १-११ ॥ म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निःसंदेह भीष्मपितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. ॥ १-११ ॥

More

03 min 28 sec

play

share

श्लोक १२,  १३

10 . श्लोक १२, १३

तस्य सञ्जनयन्‌ हर्षं कुरुवृद्धः पितामहः । सिंहनादं विनद्यौच्चै: शङ्खं दध्मौ प्रतापवान्‌ ॥ १-१२ ॥ कौरवांतील वृद्ध, महापराक्रमी, पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला. ॥ १-१२ ॥ ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः । सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत्‌ ॥ १-१३ ॥ त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा तो आवाज प्रचंड झाला. ॥ १-१३ ॥

More

06 min 50 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

सुन्दरकाण्ड

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

ॐ નમઃ શિવાય - ધૂન

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

SIDDHHAKUNJIKA STOTRA WITH ARTH

play