Logo
Logo
mic
Download
भारतातील सुप्रसिद्ध मंदिरे .

भारतातील सुप्रसिद्ध मंदिरे .

Duration

2hr 0m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

आपला भारत देश महान परंपरा,प्राचीन धर्म, अध्यात्म, विनयशील आचरण आणि अतूट भक्तीचा देश म्हणून ओळखला जातो. जगात सर्वत्र भारताला मंदिरांचा देश देखील म्हणतात. भारतात आपल्याला रस्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर आणि चौकाचौकात मंदिरे पहायला मिळतात. आपल्या देशात बरीच मंदिरे अशी आहेत, जिथे अनेक गूढ गोष्टी आहेत....त्यांचा उलगडा आजतागायत होऊ शकलेला नाही...ज्यांनी विज्ञानासमोरहि आव्हान निर्माण केले आहे...काही मंदिरामध्ये अविश्वसनीय किंवा चमत्कार म्हणता येतील अशा गोष्टी आपल्या नजरेस पडतात, अनुभवता येतात...उदाहरणार्थ - हिमाचल प्रदेशातील ज्वालादेवीच्या मंदिरात गेली शेकडो वर्षें विना तेल, विना तुपाच्या ९ मशाली अखंड पेटत आहेत....त्या कशा अखंड प्रज्वलित राहतात...याचा आजही उलगडा होऊ शकलेला नाही... भारतासारखी संपन्न प्राचीन संस्कृती जगातील अन्य कोणत्याही देशात आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मग आपण जाणून घेऊया... भारतातील काही सर्वोत्कृष्ट आणि प्राचीन मंदिरांबद्दल... त्यांच्या इतिहासाबद्दल...त्यांच्या रहस्यांबाबत... ज्यातील काही रहस्ये इतके वैज्ञानिक यश मिळाल्यानंतरही उलगडा करू शकलेली नाहीत... भारतातील ही मंदिरे त्यांच्या अद्वितीय वास्तू, आकर्षक रचना आणि समृद्ध इतिहासासाठी प्रसिध्द आहेत. जर आपण अमरनाथ मंदिर, बाहुबली मंदिर, जगन्नाथ मंदिर, ज्वाला देवी मंदीर, कामाख्या देवी मंदिर, रामेश्वर मंदिर, सोमनाथ मंदिर अशा कोणत्याही मंदिराला भेट दिली तर आपल्याला श्रद्धा , अध्यात्म आणि सांस्कृतिक वैभव पहायला मिळते...असे वैभव आपल्याला जगात कोठेही पहायला मिळणार नाही. तर, चला मग... आज या 'भारतातील सुप्रसिद्ध मंदिरे आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कथा' या विशेष मालिकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भारतातील प्रसिद्ध मंदिरांची ओळख करून देतो....

Read More

अमरनाथ मंदिर....

1 - अमरनाथ मंदिर....

10 min 59 sec

Like

6

play...

Episode info

info

Share Episode

share
बाहुबली मंदिर...

2 - बाहुबली मंदिर...

07 min 13 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
पुरीचे जगन्नाथ मंदिर ...

3 - पुरीचे जगन्नाथ मंदिर ...

09 min 18 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
ज्वाला देवी मंदिर

4 - ज्वाला देवी मंदिर

07 min 17 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
कामाख्या देवी मंदिर...

5 - कामाख्या देवी मंदिर...

06 min 52 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
रामेश्वरम मंदिर...

6 - रामेश्वरम मंदिर...

13 min 08 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
शनिदेव मंदिर...

7 - शनिदेव मंदिर...

00 min 00 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
सिद्धिविनायक मंदिर - मुंबई

8 - सिद्धिविनायक मंदिर - मुंबई

07 min 20 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
सोमनाथ मंदिर...

9 - सोमनाथ मंदिर...

00 min 00 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
श्रीनाथजी

10 - श्रीनाथजी

06 min 21 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

भारतातील सुप्रसिद्ध मंदिरे .

Stories|Marathi|15 Episodes
Like
share
like

About Show

आपला भारत देश महान परंपरा,प्राचीन धर्म, अध्यात्म, विनयशील आचरण आणि अतूट भक्तीचा देश म्हणून ओळखला जातो. जगात सर्वत्र भारताला मंदिरांचा देश देखील म्हणतात. भारतात आपल्याला रस्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर आणि चौकाचौकात मंदिरे पहायला मिळतात. आपल्या देशात बरीच मंदिरे अशी आहेत, जिथे अनेक गूढ गोष्टी आहेत....त्यांचा उलगडा आजतागायत होऊ शकलेला नाही...ज्यांनी विज्ञानासमोरहि आव्हान निर्माण केले आहे...काही मंदिरामध्ये अविश्वसनीय किंवा चमत्कार म्हणता येतील अशा गोष्टी आपल्या नजरेस पडतात, अनुभवता येतात...उदाहरणार्थ - हिमाचल प्रदेशातील ज्वालादेवीच्या मंदिरात गेली शेकडो वर्षें विना तेल, विना तुपाच्या ९ मशाली अखंड पेटत आहेत....त्या कशा अखंड प्रज्वलित राहतात...याचा आजही उलगडा होऊ शकलेला नाही... भारतासारखी संपन्न प्राचीन संस्कृती जगातील अन्य कोणत्याही देशात आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मग आपण जाणून घेऊया... भारतातील काही सर्वोत्कृष्ट आणि प्राचीन मंदिरांबद्दल... त्यांच्या इतिहासाबद्दल...त्यांच्या रहस्यांबाबत... ज्यातील काही रहस्ये इतके वैज्ञानिक यश मिळाल्यानंतरही उलगडा करू शकलेली नाहीत... भारतातील ही मंदिरे त्यांच्या अद्वितीय वास्तू, आकर्षक रचना आणि समृद्ध इतिहासासाठी प्रसिध्द आहेत. जर आपण अमरनाथ मंदिर, बाहुबली मंदिर, जगन्नाथ मंदिर, ज्वाला देवी मंदीर, कामाख्या देवी मंदिर, रामेश्वर मंदिर, सोमनाथ मंदिर अशा कोणत्याही मंदिराला भेट दिली तर आपल्याला श्रद्धा , अध्यात्म आणि सांस्कृतिक वैभव पहायला मिळते...असे वैभव आपल्याला जगात कोठेही पहायला मिळणार नाही. तर, चला मग... आज या 'भारतातील सुप्रसिद्ध मंदिरे आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कथा' या विशेष मालिकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भारतातील प्रसिद्ध मंदिरांची ओळख करून देतो....

....Loading

EpisodesDuration
अमरनाथ मंदिर....

1 . अमरनाथ मंदिर....

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या ईशान्य दिशेला 134 किलोमीटर अंतरावर असलेले अमरनाथ मंदिर हिंदूंचे एक प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र आहे... समुद्रसपाटीपासून या मंदिराची उंची तब्बल 13,600 फूट आहे. हे मंदिर भगवान महादेवाचे प्रमुख मंदिर आहे... असे म्हटले जाते की, या मंदिराच्या गुहेतच भगवान महादेव यांनी देवी पार्वतीला आपल्या अमरत्वाचे रहस्य सांगितले होते...अमरनाथला देशातील सर्वात पवित्र तीर्थस्थानापैकी एक तीर्थस्थान म्हटले जाते. चला तर मग ऐकुयात अमरनाथ मंदिराशी संबंधित काही रंजक माहिती....

More

10 min 59 sec

play

share

बाहुबली मंदिर...

2 . बाहुबली मंदिर...

मागील भागात आपण ऐकले हिंदू धर्मियांचे पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र अमरनाथ मंदिराबाबत...आता आपण ऐकणार आहोत... बाहुबली हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर आणि वृषभनाथ यांचे पुत्र बाहुबली यांच्या मंदिरांबाबत.... जैन समुदायामध्ये बाहुबली हे एक आदरणीय नाव आहे... बाहुबली यांनी वर्षभर पायावर उभे राहून कडक तपश्चर्या केली. यावेळी त्यांच्या शरीरावर झाडांच्या वेळी चढल्या, तरीही ते विचलित झाले नाहीत....बाहुबली यांचा आत्मा जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे गेला होता... त्यांनी कैलास पर्वतावर तपश्चर्या केली. जैन बांधव आदरपूर्वक त्यांना सिद्ध म्हणतात. तर चला ऐकुयात बाहुबली मंदिराबाबतच्या काही वैशिष्ट्येपूर्ण माहिती....

More

07 min 13 sec

play

share

पुरीचे जगन्नाथ मंदिर ...

3 . पुरीचे जगन्नाथ मंदिर ...

मागील भागात आपण जैन धर्माचे पहिले तीर्थंकर आणि वृषभनाथ यांचे पुत्र बाहुबली आणि त्यांच्या मंदिरांबाबत माहिती ऐकली...या भागात आपण ऐकणार आहोत देशातील प्रमुख चार तीर्थस्थळापैकी एक असणाऱ्या पुरीच्या जगन्नाथ मंदिराची गोष्ट...असे मानले जाते की भगवान विष्णू जेव्हा तेथील चारही मंदिरांमध्ये तिर्थयात्रेला जात होते, तेव्हा त्यांनी हिमालयातील उंच शिखरावर बद्रीनाथमध्ये स्नान केले. पश्चिमेकडील, द्वारकेमध्ये कपडे परिधान केले ...पुरीमध्ये जेवले आणि दक्षिणेस रामेश्वरममध्ये विश्रांती घेतली. भगवान श्रीकृष्ण पुरीमध्ये राहू लागले आणि जगचे नाथ अर्थात जगन्नाथ बनले. पुरीचा जगन्नाथ धाम चार धामांपैकी एक आहे. येथे भगवान जगन्नाथ मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रासमवेत आसनस्थ झाले आहेत.

More

09 min 18 sec

play

share

ज्वाला देवी मंदिर

4 . ज्वाला देवी मंदिर

मागील भागात आपण ऐकली, देशातील प्रमुख चार तीर्थस्थळापैकी एक असणाऱ्या आणि महान शिख सम्राट, महाराजा रणजित सिंग यांनी मुबलक सोन्याचे दान केलेल्या पुरीच्या जगन्नाथ मंदिराची गोष्ट...आता आपण ऐकणार आहोत ज्वाला मंदिराची कहानी...पौराणिक कथेनुसार ज्वाला देवी मंदिर शक्तीपीठ मंदिरांपैकी एक आहे. संपूर्ण भारतात एकूण 51 शक्तीपीठे आहेत. ही सर्व शक्तीपीठे भगवान महादेव आणि शक्तीशी जोडलेली आहेत. धार्मिक ग्रंथानुसार सतीच्या शरीराचे 51 भाग पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. ती 51 ठिकाणे सती देवीची 51 शक्तिपीठे म्हणून ओळखली जातात. त्यापैकीच एक शक्तीपीठ असलेल्या ज्वाला देवी मंदिराची गोष्ट आपण आता ऐकणार आहोत...ज्या ज्वाला मंदिरातील गूढ हजारो वर्षानंतरही उकलता आलेले नाही....तर चला मग ऐकुयात...काय आहे ज्वाला माता मंदिराचा महिमा आणि काय आहे ते गूढ....

More

07 min 17 sec

play

share

कामाख्या देवी मंदिर...

5 . कामाख्या देवी मंदिर...

मागील भागात आपण ऐकली ज्वाला देवी मंदिराची अनोखी कहानी...जेथे हजारो वर्षापासून तेल किंवा तूप न घालता ९ ज्वाळा पेटत आहेत....आता आपण ऐकणार आहोत आसामच्या गुवाहाटीजवळील कामख्या देवीच्या मंदिराची महती...कामाख्या देवीचे मंदिर भारतातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कामाख्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठ येतात...कामाख्या... कामसंपनम...कामेश्वरी... हरप्रिये... कामनामदेही... मिनेत्तम कामेश्वरी... नमोस्तुते...हा आहे कामाख्या देवीला नमस्कार करण्याचा मंत्र... ज्याचा जप केल्यानंतर सुखशांती आणि इच्छाप्राप्ती होते...आणि याच मंत्रांच्या उच्चाराने कामाख्या देवीच्या मंदिराबाबत जाणून घेऊयात काही अशा गोष्टी आवाज डॉट कॉम वर...

More

06 min 52 sec

play

share

रामेश्वरम मंदिर...

6 . रामेश्वरम मंदिर...

मागील भागात आपण जाणून घेतली आसामच्या गुवाहाटीजवळील कामख्या देवीच्या मंदिराची महती...जेथे तंत्र-मंत्र साधना करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून मांत्रिक येतात....या भागात आपण ऐकणार आहोत भगवान श्री राम यांच्यामुळे पावन झालेल्या रामेश्वरम मंदिराची माहिती...पौराणिक कथांनुसार रामेश्वरम हे असे स्थान आहे, जिथे भगवान रामाने आपल्या सर्व पापांसाठी प्रायश्चित करण्याचे ठरविले. ब्राह्मण रावणाची हत्या करुन भगवान राम यांना याच ठिकाणी तपश्चर्या करायची होती. भगवान राम यांना येथे एक मोठे शिवलिंग बांधायचे होते आणि त्यासाठी त्यांनी हनुमानाला हिमालयातून शिवलिंग आणण्यास सांगितले. हे शिवलिंग बारा द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. असे मानले जाते की श्री रामनाथस्वामी मंदिरातील मूर्ती हीच मूर्ती आहे...तर चला ऐकुया रामेश्वरम मंदिराबाबत काही रंजक गोष्टी...

More

13 min 08 sec

play

share

शनिदेव मंदिर...

7 . शनिदेव मंदिर...

मागील भागात आपण प्रभू श्री रामाच्या वास्तव्याने पावन झालेल्या रामेश्वरम मंदिराची गोष्ट...या भाह्गात आपण ऐकणार आहोत ज्या देवाचे नाव उच्चारले तरी अनेकांना धास्ती वाटते, त्या शनी महाराजांच्या शनी मंदिराची...आपण आज जी गोष्ट जाणून घेणार आहोत...आपण अशा जागेची कल्पना करू शकता जिथे कोणत्याही घराच्या बाहेरील दरवाजा नसतो जिथे दुकाने कधीही कुलूपबंद नसतात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोकांना कधीही असुरक्षित वाटत नाही. भारताच्या महाराष्ट्र राज्यात शनि शिंगणापूर नावाचे एक ठिकाण आहे, जिथे सर्व लोक कधीही घरे आणि दुकाने कुलूप लावून बंद करत नाहीत. परंतु आजपर्यंत एकही चोरी झालेली नाही. इथल्या लोकांची धार्मिक श्रद्धा यात जोडलेली आहे. शनि शिंगणापूरच्या लोकांचा असा विश्वास आहे की भगवान शनी स्वत: या गावचे रक्षण करतात.

More

00 min 00 sec

play

share

सिद्धिविनायक मंदिर - मुंबई

8 . सिद्धिविनायक मंदिर - मुंबई

मागील भागात आपण शनी शिंगणापुरची माहिती ऐकली...जिथे देव आहे, पण त्याचे मंदिर नाही...गावामध्ये घरे आहेत, पण कुठल्याही घराला दरवाजे नाहीत... आता आपण माहिती ऐकणार आहोत महती मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिराची...

More

07 min 20 sec

play

share

सोमनाथ मंदिर...

9 . सोमनाथ मंदिर...

स्वतः चंद्रदेवाने ज्या मंदिराची निर्मिती केली आहे...जे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात प्रमुख ज्योतिर्लिंग आहे...ते आहे सोमनाथ...नमस्कार...चला टा आपण ऐकुयात सोमनाथ मंदिराची माहिती....

More

00 min 00 sec

play

share

श्रीनाथजी

10 . श्रीनाथजी

श्रीनाथजी हे भगवान श्रीकृष्णाचे 7 वर्षे वयाच्या रूपातील अवतार समजले जातात. श्रीनाथजींची उपासना मुख्यत: गुजरात आणि राजस्थानमधील वैष्णव आणि भटिया तसेच भक्ति योग अनुयायी करतात. श्रीनाथजी मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेली श्रीकृष्णाची मूर्ती वृंदावन येथून आणली आहे. श्रीनाथजी हे पुष्टीमार्गीय वैष्णव पंथाचे प्रमुख पीठ समजले जाते. दरवर्षी दरवर्षी देश- परदेशातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या भागामध्ये आपण, श्रीकृष्णाच्या श्रीनाथजी अवतारातील अगाध महिमा आणि काही आश्चर्यकारक घटनांची माहिती जाणून घेऊयात...

More

06 min 21 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play