Logo
Logo
mic
Download
सार्थ श्रीमद्‍ भगवद्‍गीता - अध्याय २

सार्थ श्रीमद्‍ भगवद्‍गीता - अध्याय २

Duration

6hr 22m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेला उपदेश श्रीमद्भगवद्गीता म्हणून ओळखला जातो. श्रीमद्भगवद्गीतेची पार्श्वभूमी महाभारताच्या युद्धाची आहे. ज्याप्रमाणे सामान्य माणूस आपल्या जीवनातील समस्यांमुळे गोंधळून जातो आणि त्यानंतर जीवनाच्या एकसंधतेपासून पळून जाण्याचा निर्णय घेतो, त्याचप्रमाणे महाभारताचा महान नायक अर्जुन आपल्यासमोर येणाऱ्या समस्यांपासून घाबरतो, निराश होतो,अर्जुनाप्रमाणेच आपण सर्वजण कधी ना कधी अनिश्चिततेच्या अवस्थेत निराश होतो किंवा आपल्या समस्यांमुळे विचलित होऊन आपल्या कर्तव्यापासून दूर जातो, अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्याला दिशा दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, सार्थ श्रीमद भगवद्गीता आणि त्याचा अर्थ आता आपल्या मराठी भाषेत.

Read More

श्लोक १

1 - श्लोक १

06 min 17 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक २

2 - श्लोक २

09 min 19 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ३

3 - श्लोक ३

03 min 18 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ४

4 - श्लोक ४

04 min 51 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ५

5 - श्लोक ५

06 min 33 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ६

6 - श्लोक ६

03 min 43 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ७

7 - श्लोक ७

05 min 36 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ८

8 - श्लोक ८

08 min 16 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ९

9 - श्लोक ९

06 min 12 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक १०

10 - श्लोक १०

03 min 23 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share

सार्थ श्रीमद्‍ भगवद्‍गीता - अध्याय २

Devotional|Marathi|71 Episodes
Like
share
like

About Show

श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेला उपदेश श्रीमद्भगवद्गीता म्हणून ओळखला जातो. श्रीमद्भगवद्गीतेची पार्श्वभूमी महाभारताच्या युद्धाची आहे. ज्याप्रमाणे सामान्य माणूस आपल्या जीवनातील समस्यांमुळे गोंधळून जातो आणि त्यानंतर जीवनाच्या एकसंधतेपासून पळून जाण्याचा निर्णय घेतो, त्याचप्रमाणे महाभारताचा महान नायक अर्जुन आपल्यासमोर येणाऱ्या समस्यांपासून घाबरतो, निराश होतो,अर्जुनाप्रमाणेच आपण सर्वजण कधी ना कधी अनिश्चिततेच्या अवस्थेत निराश होतो किंवा आपल्या समस्यांमुळे विचलित होऊन आपल्या कर्तव्यापासून दूर जातो, अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्याला दिशा दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, सार्थ श्रीमद भगवद्गीता आणि त्याचा अर्थ आता आपल्या मराठी भाषेत.

....Loading

EpisodesDuration
श्लोक १

1 . श्लोक १

सञ्जय उवाच तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ । विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ सजंय म्हणाले, अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकूळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. ॥ २-१ ॥

More

06 min 17 sec

play

share

श्लोक २

2 . श्लोक २

श्रीभगवानुवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्‌ । अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २-२ ॥ श्रीभगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. ॥ २-२ ॥

More

09 min 19 sec

play

share

श्लोक ३

3 . श्लोक ३

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥ म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. ॥ २-३ ॥

More

03 min 18 sec

play

share

श्लोक ४

4 . श्लोक ४

अर्जुन उवाच कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन । इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ २-४ ॥ अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात मी भीष्मपितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण हे अरिसूदना, ते दोघेही पूज्य आहेत. ॥ २-४ ॥

More

04 min 51 sec

play

share

श्लोक ५

5 . श्लोक ५

गुरूनहत्वा हि महानुभावाञ्छ्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके । हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान्‌ रुधिरप्रदिग्धान्‌ ॥ २-५ ॥ म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे. ॥ २-५ ॥

More

06 min 33 sec

play

share

श्लोक ६

6 . श्लोक ६

न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः । यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ २-६ ॥ युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे, हे कळत नाही. किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील, हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव-धृतराष्ट्रपुत्र- आमच्या विरुद्ध उभे आहेत. ॥ २-६ ॥

More

03 min 43 sec

play

share

श्लोक ७

7 . श्लोक ७

कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः । यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌ ॥ २-७ ॥ करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. ॥ २-७ ॥

More

05 min 36 sec

play

share

श्लोक ८

8 . श्लोक ८

न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्‌ । अवाप्य भूमावसपत्‍नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्‌ ॥ २-८ ॥ कारण, पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्यसमृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल, असा उपाय मला दिसत नाही. ॥ २-८ ॥

More

08 min 16 sec

play

share

श्लोक ९

9 . श्लोक ९

सञ्जय उवाच एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप । न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ २-९ ॥ संजय म्हणाले, हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) राजा, निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. ॥ २-९ ॥

More

06 min 12 sec

play

share

श्लोक १०

10 . श्लोक १०

तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत । सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥ २-१० ॥ हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले ॥ २-१० ॥

More

03 min 23 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

सुन्दरकाण्ड

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

ॐ નમઃ શિવાય - ધૂન

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

SIDDHHAKUNJIKA STOTRA WITH ARTH

play