पोलादी पुरुष : सरदार वल्लभभाई पटेल
Duration
0hr 55m
Language
Marathi
Released
Category
Marathi Shows
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - झलक
01 min 04 sec
3
Episode info
Share Episode
2 - सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म...
07 min 28 sec
1
Episode info
Share Episode
3 - सरदार वल्लभभाई पटेल यांचे शिक्षण...
00 min 00 sec
0
Episode info
Share Episode
4 - सरदार वल्लभभाई पटेल यांचा त्याग...
06 min 37 sec
2
Episode info
Share Episode
5 - सहनशील सरदार वल्लभभाई पटेल...
07 min 04 sec
0
Episode info
Share Episode
6 - वकिली पाप आणि देशसेवा पुण्य...
06 min 16 sec
1
Episode info
Share Episode
7 - सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी..
06 min 16 sec
1
Episode info
Share Episode
8 - सरदार वल्लभभाई पटेल यांचा सत्याग्रह...
07 min 16 sec
2
Episode info
Share Episode
9 - सरदार वल्लभभाई पटेल यांचे आंदोलन...
06 min 11 sec
0
Episode info
Share Episode
10 - भारत आणि जातीभेद...
00 min 00 sec
1
Episode info
Share Episode
पोलादी पुरुष : सरदार वल्लभभाई पटेल
About Show
| Episodes | Duration | |||
1 . झलकMore | 01 min 04 sec | |||
2 . सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म...सरदार पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडीयाद येथे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांचे नाव जवेरभाई आणि आईचे नाव लाडबादेवी असे होते. सरदार पटेल यांना साहस आणि राष्ट्रभक्ती वडीलांकडून पिढीजात मिळाली होती...वडील जवेरभाई यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या सैन्यात भरती होवून इंग्रजां विरोधीतल पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता...एक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सरदार पटेल यांच्या घरात शैक्षणिक वातावरण नव्हते...मग त्यांनी शिक्षण घेतले का? त्यांना कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागले ? हे आपण या भागात ऐकणार आहोत... More | 07 min 28 sec | |||
3 . सरदार वल्लभभाई पटेल यांचे शिक्षण...सरदार वल्लभभाई पटेल हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील होते. यामुळे, त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती. पटेल यांना खूप शिकण्याची इच्छा होती...ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना अनेकाीं नानाविध सल्ले दिले...पण त्यांच्या मनात दुसराच विचार चालला होता...तो नेमका कुठला विचार होता ? त्यांना पुढे आणखी शिक्षण घ्यायचे होेते की आणखी काय करायचे होत ? ते गोध्रा कशासाठी गेले ? या सर्व गोष्टींचा उलगडा या भागात होणार आहे. More | 00 min 00 sec | |||
4 . सरदार वल्लभभाई पटेल यांचा त्याग...सरदार वल्लभभाई पटेल यांना बॅरिस्टर व्हायचे होते...त्यासाठी त्यांना परदेशात जावे लागणार होते...त्याचा खर्च तसा मोठा होता आणि पटेल यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते...परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी ते पैपै जोडून ठेवू लागले...पटेल यांची जेव्हा परदेशात जाण्याची वेळ आली, त्यावेळी अचानक त्यांचे वडीलबंधू विठ्ठलभाई यांनी परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली...आपल्या वडीलबंधूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी वल्लभभाई पटेल यांनी आपल्या इच्छेला मुरड घातली. जमवलेले सगळे पैसे विठ्ठलभाई यांना देवून टाकले...मग वल्लभभाई पटेल यांचे बॅयिस्टर होण्याची स्वप्न पूर्ण झाले का? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा आवाज डॉट कॉम. More | 06 min 37 sec | |||
5 . सहनशील सरदार वल्लभभाई पटेल...सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पत्नी एकदा खूप आजारी होत्या... त्यांनी पत्नीला मुंबईत उपचारासाठी दाखल केले...ऑपरेशन काही दिवसांचा कालावधी होता, त्यामुळे पटेल गुजरातला परतले... एके दिवशी पटेल कोर्टात खटला लढत असतानाच अचानक पत्नीच्या मृत्यूची बातमी त्यांना मिळाली...पण त्यास्थितीतही त्यांनी खटला चालूच ठेवला... कोर्ट संपल्यानंतर जेव्हा त्यांनी आपल्या पत्नीच्या मृत्यूची बातमी सहकार्यांना सांगितली तेव्हा कामाप्रती सरदार पटेल यांची असणारी निष्ठा बघून सर्वजण अवाक् झाले...वल्लभभाई पटेल यांनी आयुष्यात अनेक प्रसंगाना संयमाने तोंड दिले...जाणून घेवूयात या भागात.... More | 07 min 04 sec | |||
6 . वकिली पाप आणि देशसेवा पुण्य...सरदार वल्लभभाई पटेल हे व्यवसायाने वकील होते. वकिलीत अल्पावधीत त्यांचा नावलौकिक झाला होता... पण त्यांनी एकदा आपल्या भाषणात वकिली हे पाप मानले.... त्यांचा मते देशसेवा हे सर्वात मोठे पुण्य कार्य आहे...ज्यावेळी पटेल यांनी हे मत मांडले...त्यावेळी देशात कशी स्थिती होती...त्यांनी देशसेवेचा श्रीगणेशा कधी केला?...जाणून घेवूयात या भागात... More | 06 min 16 sec | |||
7 . सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी..सरदार वल्लभभाई पटेल हे महात्मा गांधीजींच्या कार्याने प्रभावित झाले होते...गांधीजींना ते खूप मानत असत...सरदार पटेल यांचे विचार आणि देशप्रेम बघून गांधीजीही प्रभावीत झाले होते... देशात असहकार चळवळ सुरू असतानाच चौरीचौरा घटना घडली...या घटनेमुळे व्यथीत झालेल्या महात्मा गांधी यांनी आंदोलन स्थगित केले...त्यानंतर गांधीजींना अटक होवून 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली...अशा बिकट स्थितीत सरदार पटेल यांनी महात्मा गांधी यांची कशी मदत केली ? हे आपण या भागात ऐकणार आहोत.. More | 06 min 16 sec | |||
8 . सरदार वल्लभभाई पटेल यांचा सत्याग्रह...भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून सरदार वल्लभभाई पटेल लढत होते...लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना निमाण करत होते...बघता बघता सरदार पटेल राष्ट्रीय नेते म्हणून ओळखले जावू लागले होते. वल्लभभाई पटेल हे ‘सरदार’ वल्लभभाई पटेल कसे झाले ?...त्यांची ‘सरदार’ होण्याची कहाणी सत्याग्रहाशी निगडित आहे... तर चला मग जाणून घेवूयात वल्लभभाई पटेल यांचा ‘सरदार’ वल्लभभाई पटेल होण्यापर्यंतचा रंजक प्रवास... More | 07 min 16 sec | |||
9 . सरदार वल्लभभाई पटेल यांचे आंदोलन...एक काळ होता, जेव्हा सरदार पटेल देशभर स्वातंत्र्यलढयासाठी जनजागृती करण्यासाठी अहोरात्र प्रवास करत होते... लोकांना स्वातंत्र्याबद्दल जागृत करत असत....आता त्यांनी अहमदाबादमधील भाड्याचे घरदेखील सोडले होते... त्यानंतर ते कधी तुरूंगात तर कधी तुरूंगाच्या बाहेर...असा त्यांचा प्रवास सुरू झाला... त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यालढ्यात किती योगदान दिले ? त्यासाठी त्यांना किती यातना सोसाव्या लागल्या ? हे आपण या भागात ऐकणार आहोत...तर एकत रहा आवाज डॉट कॉम... More | 06 min 11 sec | |||
10 . भारत आणि जातीभेद...महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी आणि इतर नेत्यांनी कोट्यवधी भारतीयांना सोबत घेवून इंग्रजांची जुलमी राजवट उलथून टाकली...15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले...पण स्वातंत्र्यानंतर देशात धार्मीक आणि जातीय दंगली पेटल्या... अशा परिस्थितीत सरदार पटेल हे एक एक शक्ती म्हणून उदयास आले. त्यांनी केवळ देशाचा इतिहासच नाही तर भूगोलही बदलला... अनेक छोट्यामोठ्या संस्थांनाना देशात विलीण करून घेतले... जम्मू-काश्मीर भारतात कसे विलीन झाले आणि या विलीणीकरणामध्ये सरदार पटेल यांचे काय योगदान होते?... ते आपण ऐकूयात.. More | 00 min 00 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी
दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन
सप्तशृंगी देवीची माहिती !
चित्रा











